Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत आज महिला ‘लक्षवेधी’, प्रस्तावित महिला धोरणावरही चर्चा
Continues below advertisement
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे... सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडतील. विधानसभा कामकाजात आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे... आणि यामध्ये यशोमती ठाकूर, देवयानी फरांदे, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले, यामिनी जाधव, जयश्री जाधव, सरोज अहिरे यांचा समावेश आहे. . महिला आमदारांच्या योग्य सूचनांचा समावेश करून ते धोरण चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर होण्याची शक्यता आहे... महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र त्याला विधिमंडळाची मंजुरी मिळण्याच्या आधीच सरकार कोसळलं होतं..
Continues below advertisement