Maharashtra Budget 2023 : अर्थमंत्री फडणवीस सादर करणार बजेट, बळीराजाला काय मिळणार?

Continues below advertisement

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.. कारण आज दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प माडंणार आहेत. अर्थमंत्री म्हणून फडणवीसांचा हा पहिला अर्थसंकल्प असेल. अवकाळी पाऊस, नापिकी आणि कोसळलेले भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, बजेटमध्ये बळीराजासाठी काय असणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तसंच, राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणण्यासाठी सरकार नेमके काय प्रयत्न करणार, आणि त्यासाठी किती तरतूद केली जाणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यानं, अर्थमंत्री फडणवीस यांना बजेटमध्ये तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram