BJP Ghantanaad Andolan | दार उघड उद्धवा दार उघड मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन
राज्यातील मंदिरं, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडी आज घंटानाद आंदोलन करणार आहे. गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मंदिरं सुरु करण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ 'दार उघड उद्धवा दार उघड' अशी हाक देत आज राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केलं जाणार असल्याचं अध्यात्मक समन्वय आघाडीतर्फे सांगण्यात आलं. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला. मुसळधार पावसातही संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटनाद आंदोलन करण्यात आ