Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराची पत्नी आठ महिलांसह भारत परिक्रमा मोहिमेवर ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्रातल्या आठ महिला निघाल्या आहेत भारत परिक्रमा मोहिमेवर.. भंडारा गोंदिया चे भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे यांच्या संकल्पनेतून आठ महिला या अनोख्या मोहिमेवर निघाल्या आहेत. 25 दिवस सलग कार ड्रायव्हिंग करत या महिला भारताच्या तेरा राज्यांमधून अकरा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.. नागपूर पासून दिल्ली हा टप्पा सध्या त्यांनी पार केला आहे आणि इथुन नंतर भारताच्या पूर्व किनारपट्टीला वळसा घालत त्या पुन्हा नागपूर मध्ये पोहोचणार आहेत. दोन कारमधून या आठ महिला प्रवास करत आहेत..  त्यांच्या अनोख्या मोहिमेविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram