Maharashtra BJP : अजित पवार यांच्या CBI चौकशीच्या मागणीसाठी भाजप कार्यकारिणीत ठराव मांडणार : सूत्र

गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असते, मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. आज दिवसभर भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. ज्याला राज्यभरातून चौदाशे कार्यकर्ते हजेरी लावतील. या बैठकी आधीच एबीपी माझा ही विश्वसनीय माहिती मिळाली. परमविर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला. आता याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola