Maharashtra BJP : भाजपच्या LokSabha संपर्क अभियानाची आजपासून सुरुवात, बावनकुळे करणार शुभारंभ
Continues below advertisement
भाजपच्या लोकसभा संपर्क अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळी ११ वाजता तूकुम परिसरातील दिवाकर प्रिंटिंग प्रेसपासून कार्यालयापर्यंत‘संपर्क से समर्थन’ अभियानाने दौऱ्याला सुरुवात करतील. या अभियानाअंतर्गत बावनकुळे सामान्य नागरिकांशी संवाद साधतील. चंद्रपूर लोकसभेतील सर्व 6 विधानसभांचा आढावा घेतील आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तर दुपारी 1 वाजता बुरूडकर सभागृहात वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
Continues below advertisement