BJP Candidate List : मुंबईतील 2, एकूण 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं, भाजपची रणनीती यशस्वी ठरणार?

Continues below advertisement

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी (BJP Candidate 2nd List) जाहीर केली आहे. भाजपने बुधवारी संध्याकाळी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहिर करण्यात आला आहे.  चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. असं असलं तरी भाजपच्या काही नेत्यांची तिकीटे कापण्यात आली आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram