Bird Flu In Maharashtra | राज्यात बर्ड फ्लूचा वेगाने प्रसार; मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव
Maharashtra Bird Flu : कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता परभणीपाठोपाठ मुंबई, ठाणे, बीड, तसेच रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली.