Bhimashankar Jyotirlinga Controversy : भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता : ABP Majha

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर... पण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारने म्हटलं आहे.  भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी केला आहे. ... एवढेच नाही तर आसाम पर्यटन विभागाने यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे.  याविरोधात आता महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केलीए...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola