Dharashiv Crime : धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार, पवनचक्की कर्मचाऱ्यांकडून तिघांना मारहाण
धाराश्रीमध्ये पवनचक्की कर्मचाऱ्यांकडून तिघांना अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे. भूम तालुक्यातील सुपटा येथे शुक्रवारी ही घटना घडली. सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड आणि स्टंपने तिघांना मारहाण केली. मुरूम वाहतुकीचा फोटो काढल्याच्या कारणावरून ही मारहाण झाली. मारहाण झालेल्यांमध्ये माजी सरपंच बजरंग गोयकर, स्वप्नील गोयकर आणि ज्ञानेश्वर करगळ यांचा समावेश आहे. या मारहाणीत माजी सरपंच बजरंग गोयकर यांच्या पाठीवर आणि पोटावर जबर मार लागला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. "मुरूम वाहतुकीचा फोटो का काढला" या कारणावरून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील कारवाईची अपेक्षा आहे.