Bandh : Thane Shivsena : शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना मारहाण, ठाण्यात शिवसैनिकांची दादागिरी

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे आवाहन करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रॅली काढली. या रॅलीत महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे एकत्र होते. पाचपाखडी येथून ही रॅली सुरू झाली आणि जांभळी नाका, बाजारपेठ, ठाणे स्टेशन करत ही रॅली नौपाडा येथील मल्हार सिनेमा जवळ संपली. रॅली सुरू असताना राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्त्यानी जबरदस्तीने देखील दुकाने बंद केली. रिक्षावाल्यांना धमकावले. महाराष्ट्र बंद यशस्वी व्हावा यासाठी बाजारपेठ परिसरात दमदाटी देखील केली. याचे व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती देखील लागले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola