Maharashtra Bandh : Jalgaon मध्ये MVA-BJPकार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, भाजपचे कार्यकर्ते जखमी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महा विकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या बंदला गालबोट लागले आहे ,महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले, भाजप कार्यकर्त्यांमध्ये व महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आणि दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत,सध्या वरणगाव येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून तणाव पूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे विकास आघाडीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता या बंदला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंद पाळण्याचे आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते , यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोघांच्या मध्ये बाचाबाची होऊन झटापट झाली तर काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली,या वेळी दोन्ही पक्षांचे शंभरहून अधिक कार्यकर्ते समोर आले होते,मात्र पोलीस बंद असल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी दोन्ही गटातील पाच ते सहा कार्यकर्ते या हाणामारीत जखमी झाल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.