Maharashtra : PFI च्या अटकेतील कार्यकर्त्यांकडून दहशतवादाचं प्रशिक्षण? ABP Majha
पीएफआयच्या अटकेतील कार्यकर्त्यांनी मराठवाड्यातील काही भागात फिजिकल ट्रेनिंगच्या नावाखाली दहशतवादाचं प्रशिक्षण दिल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलंय.. याशिवाय आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एटीएसने न्यायालयात केलाय.. अटकेतील आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप व हार्डडिस्क जप्त करण्यात आलीय. एटीएसच्या युक्तिवादानंतर दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या पाचही आरोपींची पोलीस कोठडी दोन दिवस वाढवण्यात आलीय.