Maharashtra Winter Session : डिनर टेबलावर शिजली रणनीती,सत्ताधारी आघाडी कसं प्रत्युत्तर देणार?

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आघाडीला घेरण्याची भाजपची रणनीती काल डिनर टेबलवर शिजली. काल रात्री भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमात सरकारला कसं घेरायचं याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केलं. नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्यावरून सरकारला घेरण्याची तयारी भाजपनं केलीय. तर भाजपला वेगवेगळ्या मुद्यावर आक्रमक होत प्रत्युत्तर देण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीनं केलीय. त्यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्षवेधी सत्ताधाऱ्यांनी मांडली आहे. त्यावर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola