Nana Patole | विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण, पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट
Continues below advertisement
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चाललाय. कोरोनाविरोधातील लढाईत अनेकजण कोरोनाच्या विळख्यातून जसे अनेक कोरोना योद्धे सुटले नाहीत तसं अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला. आता कोरोनामुळं पावसाळी अधिवेशनावर देखील सावट आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळं वेळेआधी स्थगित करावं लागलं होतं. कोरोनाच्या सावटामुळं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र त्यावर देखील कोरोनाचं सावट आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याआधीही राज्यातील अनेक आमदारांसह काही मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
Continues below advertisement