Maharashtra Assembly Session : दानवेंंचं निलंबन ते मुंबईतील पाणीपुरवठा; विधानसभेत काय काय घडलं?
विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा फेरविचार. अंबादास दानवे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा फेरविचार होण्याची शक्यता.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा ठाकरे गटाच्या आमदारांकडून निषेध, निलंबन मागे घ्या, अनिल परबांची विधानपरिषदेत मागणी.
विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थित, अंबादास दानवेंवरील निलंबन कारवाईचा आमदारांकडून निषेध, कालही याच विषयावरुन ठाकरे गटाच्या आमदारांचा सभागृहातून वॉकआऊट.
पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या पालख्या आणि वाहनांना २१ जुलैपर्यंत पथकरातून सूट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स वाहनांना दिलं जाणार.
मनोज जरांगेंनी १३ जुलैपर्यंत वेळ दिलीय, टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम, शंभूराज देसाईंची माहिती.
स्मार्ट मिटरविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, स्मार्ट मिटर कोणासाठी, अदानींच्या फायद्यासाठी, विरोधकांची घोषणाबाजी.
डोंबिवली स्फोटावर विधान परिषदेत लक्षवेधी, आमदार उमा खापरेंनी मांडली लक्षवेधी.