Maharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

Continues below advertisement

Maharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ? 

राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly Election 2024 Result Maharashtra) जाहीर झाला. महायुतीनं (Mahayuti) यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलं. तर महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यामध्ये काँग्रेसचे विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा समावेश आहे.   पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपाच्या अतुल भोसले यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. तर, संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांना भाजपच्या अतुल खताळ यांनी हरवलं. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसकडून हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू होती. मात्र, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram