Kopargaon Vidhan Sabhaकोपरगाव मतदारसंघातला वाद थेट दिल्ली दरबारी,कोल्हे परिवाराने घेतली शाहांची भेट
Continues below advertisement
Kopargaon Vidhan Sabha : कोपरगाव मतदारसंघातला वाद थेट दिल्ली दरबारी, अमित शाहांची मध्यस्ती
कोपरगावातली महायुतीतली बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलंय. हा वेद थेट दिल्ली दरबारी गेला. अमित शाहांनी यात मध्यस्थी केल्याची माहिती आहे. दिल्लीत कोल्हे परिवाराने फडणवीसांच्या उपस्थितीत शाहांची भेट घेतली. दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सोशल मीडियात भावनिक पोस्ट करत कार्यकर्त्यांना साद घातलीय. दोन पावलं मागे येणं म्हणजे १० पावलं पुढे जाण्यासाठी घेतलेली भूमिका असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. भाजप नेतृत्वाने विवेक कोल्हेंच्या कार्याची दखल घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमधून सूचित केलंय.
Continues below advertisement
Tags :
Snehlata Kolhe Maharashtra Assembly Election 2024 Vivek Kolhe Maharashtra Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Kopargaon Vidhan Sabha