Maharashtra Assembly Clash | विधानभवनाबाहेर राजकीय नाट्य, Awhad यांचा मध्यरात्री आंदोलन, अटकसत्र सुरू
मध्यरात्री विधानभवनाबाहेर राजकीय नाट्य घडले. महाराष्ट्राचे राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आले आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी झाली. या मारहाण प्रकरणी पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांना थोड्याच वेळात किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार का, याकडे लक्ष लागले आहे. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आव्हाड संतापले. त्यांनी काल मध्यरात्री विधानभवनाच्या गेटवर आंदोलन केले. सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी आणण्यासाठी थेट जीपसमोर आडवे पडून आंदोलन सुरू केले. अखेर पोलिसांनी जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना अक्षरशः मागे खेचून काढले. आव्हाडांच्या आंदोलनाच्या वेळी आमदार रोहित पवारही तिथे उपस्थित होते. आव्हाडांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. "व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तंबाकू तुमचे इन्स्पेक्टर त्याला तंबाकू खायला देतो हो चालतं तुम्हाला? पहिले जे इन्स्पेक्टरला सस्पेंड करा," असे आव्हाड म्हणाले. या घटनेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी माननीय अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली होती आणि सहकाऱ्यांकडून चूक झाल्याचे मान्य केले. कायद्याला मानणारे कार्यकर्ते असल्याने कारवाईला कोर्टात सामोरे जाऊ असे पडळकर यांनी सांगितले.