Asha Bhosle : आशा भोसलेंनी आपल्या सुरेल आवाजानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं : ABP Majha

Continues below advertisement

गेल्या सात दशकांहूनही अधिक काळ संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांना महाराष्ट्रभूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. भारतरत्न सचिन तेंडुलकरची उपस्थिती हे महाराष्ट्रभूषण सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरलं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आशा भोसले यांना २०२१ या वर्षासाठी महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीनं आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार आशाताईंना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. भारतरत्न सचिन तेंडुलकरही या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. वयाच्या नव्वदीत दाखल होऊनही आशा भोसले यांनी कायम राखलेला चिरतरुण उत्साह या सोहळ्यातही दिसून आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram