Maharashtra :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद समोर ,दाभोळ कुटंबीयांवर घराणेशाहीचा आरोप
Continues below advertisement
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद समोर आलाय. संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा ७ कोटी रुपये निधी असलेला ट्रस्ट अवैधरित्या ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलाय. दाभोलकर कुटुंबीयांवर त्यांनी घराणेशाहीचा आरोपही केला. अविनाश पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर संघटनेतील वाद चव्हाट्यावर आलाय. एन डी पाटील यांच्या निधनानंतर अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटानं घेतला. मात्र अविनाश पाटील यांनी त्याला आक्षेप घेतलाय.
Continues below advertisement