Maharashtra : सीमावाद आणि राज्यपालांच्या वक्तव्यावर पंतप्रधानांसोबत सर्वापक्षीय खासदारांची चर्चा
महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत चर्चा करणार आहे.. या भेटीदरम्यान, शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांची आणि बेळगाव सीमावादात तेल ओतणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची, महाराष्ट्राचे खासदार मोदीकडे तक्रार करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.. अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांना एकत्रितपणे पंतप्रधान निवासस्थानी बोलवत असतात. दरम्यान यंदा महाराष्ट्र खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला वेगवेगळे कांगोरे असल्यानं या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे..
Tags :
Narendra Modi Prime Minister Maharashtra Governor Karnataka Border Maharashtra Maharashtra MP