Bachchu Kadu Protest: सरकार सकारात्मक, लवकरच तोडगा निघेल, कडूंच्या आंदोलनावर कृषीमंत्र्यांचे आश्वासन
Continues below advertisement
नागपुरात (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला आहे. यावर राज्याचे कृषिमंत्री यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'मंत्र्यांना कापा, आमदारांना कापा, असं बच्चू भाऊ ओघात बोलले असतील', असे म्हणत कृषिमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना आधार देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या मागण्यांबाबत सकारात्मक असून, लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. कालच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी साडेअकरा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. चर्चेसाठी वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement