FDI Investment :परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन,एफडीआयमध्ये महाराष्ट्र आघाडीवर :ABP Majha
महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील सर्वाधिक एफडीआय अर्थात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत महाराष्ट्रात ३६ हजार ६३४ कोटींची परदेशी गुंतवणूक आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे.