Maharashtra Accident Cases : राज्यात रस्ते अपघातांचा उच्चांक, वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर

सध्या राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय. गेल्या ६ महिन्यांमध्ये पाच हजार ८९७ रस्ते अपघातात ६,४३७ जणांचा मृत्यू झालाय.  तर मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर डिसेंबर २०२२ ते ३ जुलै या सात महिन्यांतील ५१ अपघातांत १०६ जणांचा बळी गेला. गेल्या आठवडय़ात समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात खासगी बसला भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या महामार्गावरील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात होता. या अपघातामुळे वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर राज्यभरातील रस्ते अपघातांची आकडेवारी उघड झाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola