Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धान खरेदीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ
आधारभूत दान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून 31 जानेवारीपर्यंत धान खरेदी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. त्यानुसार धान खरेदीचे पोर्टल 31 जानेवारीला बंद पडल्याने नोंदणीनंतरही धान खरेदी झाली नाही. याबाबत एबीपी माझाने बातमी दाखविताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान खरेदीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश दिले.... धान खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असून शेतकऱ्यांनी एबीपी माझा चे आभार मानले..