Maharahstra Elections : मुंबईसह राज्यातील 15 महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता

Continues below advertisement

मुंबईसह राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. १५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाला निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यात प्रभाग रचनेला अंतिम रुप देण्यासाठी २५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. तसंच मतदार याद्या तयार करण्यासाठीही २५ दिवस लागू शकतात. त्यानंतर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ऑगस्टपर्यंत वेळ लागेल. त्यानंतरच १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतला जाण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram