Mahabaleshwar Helicopter Ride: महाबळेश्वरमध्ये हेलिकॉप्टर राईड सुरू, आकाशातून महाबळेश्वरची हवाई सफार
Mahabaleshwar Helicopter Ride: महाबळेश्वरमध्ये हेलिकॉप्टर राईड सुरू, आकाशातून महाबळेश्वरची हवाई सफार
महाराष्ट्राचा मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये सध्या एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवल मध्ये विविध कार्यक्रम गेल्या दोन दिवसापासून पार पडत आहेत. परंतु पर्यटकांच प्रमुख आकर्षण ठरल आहे ते म्हणजे हेलिकॉप्टर सफारी. हेलिकॉप्टर मधून महाबळेश्वरचा नयनरम्य नजारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या राईडला पसंती देऊ लागले आहेत. हेलिकॉप्टर मधून महाबळेश्वरच्या नयनरम्य हजार याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी..
हे ही वाचा..
राज्यातील बारावीचा निकाल (HSC Result 2025) उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली.