MVA on Election Commission : मतदार याद्यांत घोळ,निवडणुका रद्द करण्याची मागणी
Continues below advertisement
महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावरून निवडणूक आयोगाची भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी आयोगाच्या कामकाजावर तीव्र आक्षेप नोंदवला. 'जोपर्यंत मतदार यादीतला घोळ सुधारत नाही, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत,' अशी रोखठोक मागणी राज ठाकरे यांनी केली. मतदान गुप्त असते, मग मतदार याद्या गोपनीय का, असा सवालही राज यांनी विचारला. तर, 'निवडणूक आयोग काही हरिश्चंद्र नाही, हे Election for Selection आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरीच कोणीतरी व्यक्ती चालवत असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला, तर काही ठिकाणी एकाच घरात अनेक मतदार नोंदवल्याचे पुरावेही सादर केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement