Magnetic Maharashtra | मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ; विविध देशातील कंपन्यांसोबत 16 हजार कोटींचे गुंतवणूक करार

Continues below advertisement
मुंबई : एकीकडे कोरोना संकटाशी लढत असताना दुसरीकडे राज्य सरकारने विविध देशातील कंपन्यांसोबत 16 हजार कोटींचा सामंजस्य करार केला आहे. राज्यात इतकी कठीण परिस्थिती असताना आपण महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करू. हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram