Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील OBC आरक्षणासाठी केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायलयात धाव : ABP Majha

 ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात तर निवडणुका होत आहेत. मात्र महाराष्ट्राप्रमाणेच निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या मध्यप्रदेशातल्या निवडणुकांसाठी आता केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. 17 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत केंद्रानं पुनर्विचार याचिका दाखल केलीय. ओबीसी आरक्षणासह निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सर्वोच्च न्यायालायनं केलेला हा हस्तक्षेप योग्य नसल्याचा दावा करत केंद्रानं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. मात्र मध्य प्रदेशच्या मदतीला धावलेलं केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सापत्न वागणूक देतंय का याची चर्चा सुरू झालेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola