Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special Report
Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special Report
प्रेमाच्या अथांग समुद्रात बुडालेली श्रद्धा वालकर तुम्हाला आठवते? याच प्रेमात तिला धोका मिळाला. तिच्या प्रेमाचे ३५ तुकडे झाले.. या घटनेचा विसर पडत नाही तोवर अशीच आणखी एक धक्कादायक घटना घडलीये. मध्यप्रदेशच्या देवासमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केलीये. तब्बल दहा महिन्यांनंतर प्रेयसीचा मृतदेह सापडला तो ही फ्रीजमध्ये.. लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहणाऱ्या या जोडप्यात नेमकं कशावरुन बिनसलं? प्रियकराने थेट प्रेयसीचा गळा का घोटला? जाणून घेऊया या रिपोर्टमधून..लिव्ह इन रिलेशनशिप आणि हत्या एखाद्या क्राईम सिरियलचा सीन वाटावा अशी घटना मध्य प्रदेशच्या देवास मध्ये घडलीये. ((घराचे व्हिज्युअल्स)) वर्षभरापूर्वी या घरात एक जोडपं राहत होतं इतरांसाठी ते दोघं पती पत्नी होते पण खरं तर ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.. संजय आणि प्रतिभा दोघांनीही लग्न न करता इथे संसार थाटला होता पण प्रतिभाला आता खरा खुरा संसार थाटायचा होता त्यासाठी तिने संजयकडे तगादा लावला पण तिच्या गळात मंगळसूत्र घालण्याऐवजी त्याने तिचा गळा घोटला वॉकथ्रू-((घराच्या समोर केलेला मला विचारा कुठून लावायचा ते)) मार्च २०२४ मध्ये प्रतिभाची हत्या केल्याचा अंदाज आहे तब्बल दहा महिने प्रतिभाचा मृतदेह फ्रिजमध्ये सडत होता. तर दुसरीकडे सर्वांशी हसून खेळून राहणारी प्रतिभा एकाएकी गेली कुठे असा प्रश्न तिच्या शेजाऱ्यांना पडला होता.. बाईट- शेजारचीचा बाईट या घटनेनंतर श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली तेव्हाही लिव्ह इन मधल्या प्रेमाचा हा असाच शेवट झाला होता लिव्ह इन रिलेशनशिपला कोर्टाने जरी मान्यता दिली असली तरी समाजात अजूनही या नात्याला म्हणावं तसं स्विकारलं जात नाही त्यात जर अशा घटना घडणार असतील तर या नात्याला स्विकारणं आणि समाजात या नात्याला स्थान मिळणं कठीण आहे