Madha Loksabha Election Special Report : महायुतीत पडला माढ्याचा तिढा
Continues below advertisement
Madha Loksabha Election Special Report : महायुतीत पडला माढ्याचा तिढा भाजपने रणजीतसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माढा मतदारसंघातील भाजपचे मोहिते पाटील आणि फलटणचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले रामराजे निंबाळकर यांची नाराजी निर्माण झाली. रविवारी अकलूजमध्ये शेकापचे जयंत पाटील यांनी अचानक मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्याशी बैठक घेतल्याने महायुतीचे नेते चांगलेच पेचात सापडले आहेत. त्यानंतर महायुतीकडून या नाराजीनाट्यावर पडदा पाडण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू झालाय. मुंबईत अजित पवारांचा देवगिरी बंगला आणि फडणवीसांचा सागर बंगल्यावर बैठका झाल्या.
Continues below advertisement