Longest Fish : चिलीतल्या एरिकामध्ये 'अशुभ मासा', 'ओअर फिश' मिळणं अशुभ मानलं जातं
दक्षिण अमेरिकेतील चिलीतल्या एरिकामध्ये दोन दिवसांपूर्वी मासेमाऱ्यांच्या जाळ्यात एक भला मोठा मासा सापडला. ओअर फिश नावाचा हा मासा जवळपास १६ फूट लांबीचा होता. पण हा मासा जाळ्यात सापडणं हा एक अशुभ संकेत असल्याचं मानलं जातंय. कारण ओअर फिश सामान्यत: खोल समुद्रात आढळणारा मासा आहे. भूअंतर्गत हालचालींमुळे हा मासा भूपृष्ठालगत आला असावा. आणि त्यामुळेच ही धोक्याची घंटा असल्याचं मानण्यात येतंय.