Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha

Pune Bhusi Dam Monsoon Trip : पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं असून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

धबधब्यातून भुशी धरणात वाहून गेलेलं अख्खं कुटुंब

भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत. यामध्ये लहान मुलं-महिलांचा समावेश आहे. पाच जणांमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, इतर तिघांचं शोधकार्य सुरु आहेत. सहलीसाठी  गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola