Loksabha MVA Planning : लोकसभेच्या मुंबईतील जागांसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? सेनेला चार जागा?

Loksabha MVA Planning : लोकसभेच्या मुंबईतील जागांसाठी महाविकास आघाडीत 4-1-1 चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. या सहापैकी चार जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं कळतंय. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, आणि ईशान्य मुंबई या त्या चार जागा आहेत. दक्षिण मुंबईसाठी अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिमसाठी अमोल कीर्तिकरांचं नाव चर्चेत आहे. तर ईशान्य आणि दक्षिण मध्य मुंबईसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola