BMC on Remdesivir : रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी लोकायुक्तांची मुंबई पालिकेला क्लीन चिट
एकीकडे कथित कोविड घोटाळा प्रकरणात मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या लोकायुक्तांनी मात्र रेमडेसिवीर खरेदीत मुंबई महापालिकेला क्लीन चिट दिलेय. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीत अनियमितता आणि अपारदर्शकता झाल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या प्रकरणात पालिकेनं सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचं सांगत लोकायुक्तांनी पालिकेला क्लीन चिट दिलेय