Lok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?

Continues below advertisement

Lok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?

मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात आज मतदान होतंय. महाराष्ट्रच नव्हे तर साऱ्या देशाचं लक्ष या सहा मतदारसंघांच्या निकालाकडं आहे.याचं कारण म्हणजे, शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मुंबई कुणाची हे सांगणारा हा पहिलाच फैसला आहे. त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिमचा मतदारसंघ आहे. इथं रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होतेय.मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव आणि मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत होतेय. या तीन मतदारसंघाचा कौल मुंबईत निर्णायक ठरणार आहे. भाजप आणि ठाकरे गट असा सामना मुंबई उत्तर-पूर्वमध्ये रंगलाय. इथं संजय दीना पाटलांविरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा मैदानात उतरलेयत. मुंबई उत्तरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होतेय. तिथं पियूष गोएल विरुद्ध भूषण पाटील असे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.मुंबई उत्तर-मध्यमध्ये भाजपचे उज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी एकमेकांना आव्हान दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram