Lok Sabha Elections 3rd Phase Voting : राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान
Lok Sabha Elections 3rd Phase Voting : राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान
देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात ११ तर देशात ९३ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मतदान होणार आहे. गुजरातमधील सर्व २५ जागांवर आज मतदान होईल. सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकलीय. महाराष्ट्रात ११ जागांवर, उत्तर प्रदेशात १० जागांवर, कर्नाटकातल्या उर्वरित १४ जागा, छत्तीसगडमधील ७, मध्य प्रदेशातल्या ८, बिहारमधील ५, आसाममधील ४ तर पश्चिम बंगाल आणि गोव्यातल्या प्रत्येकी दोन जागांवर आज मतदान होईल. याशिवाय दादरा नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातही आज मतदान होत आहे. तर अनंतनाग राजौरीमधील मतदान सहाव्या टप्प्यात ढकलण्यात आलंय. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.