Lok Sabha Election : नवी दिल्लीत 2 महत्वाच्या बैठका, महायुतीचं जागावाटप आज ठरणार

Continues below advertisement

 Lok Sabha Election :  नवी दिल्लीत 2 महत्वाच्या बैठका, महायुतीचं जागावाटप आज ठरणार   
लोकसभा निवडणुकासाठी महायुतीचं जागावाटप आज नवी दिल्लीत फायनल होणार आहे. दिल्लीत आज दोन महत्त्वाच्या बैठका आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भाजपचे उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 

मात्र भाजपच्या बैठकीआधी महायुतीची देखील दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. अजित पवार या बैठकीला जाणार नाहीयेत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram