Lok Sabha Election 2024 : रवींद्र वायकरांच्या प्रचार रॅलीत गजानन कीर्तिकर उपस्थित

Continues below advertisement

Lok Sabha Election 2024 : रवींद्र वायकरांच्या प्रचार रॅलीत गजानन कीर्तिकर उपस्थित 
चार दिवसात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे.. मात्र त्यापूर्वी राज्यातील अनेक विभागात प्रचाराची रंगत वाढलेय..यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी एकाच कुटुंबात लढत पाहायला मिळतेय.. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे.. आज सुप्रिया सुळेंच्या प्रचारात त्यांच्या आई प्रतिभा पवारही सहभागी झाल्या होत्या..प्रतिभा पवार पहिल्यांदाच प्रचारात सहभागी झाल्याच पाहायला मिळालं.. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबीय सक्रिय होताना दिसत आहे.. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट सामना रंगणार आहे.. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आलेय. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी देण्यात आलेय.. मात्र गजानन कीर्तिकर यांनी मुलाच्या विरोधात मैदानात उतरत रवींद्र वायकरांना पाठिंबा जाहीर केलाय.. आज रवींद्र वायकरांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत मी युतीधर्म पाळणारा माणूस असल्याचं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलंय.. त्यामुळे एकीकडे लेकीच्या प्रचारासाठी आई मैदानात उतरल्याचं दिसत असताना..उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मुलाविरोधात स्वतः बाप मैदानात उतरल्याचं स्पष्ट होतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram