Lok Sabha Election 2024 : राज्यातील पाचही मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान, प्रचार थंडावला
Continues below advertisement
Lok Sabha Election 2024 : राज्यातील पाचही मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान, प्रचार थंडावला
राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचं दिसतंय. विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 ला पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 17 एप्रिल ला भंडारा-गोंदिया लोकसभेतील अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभेतील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजता प्रचारतोफा थंडावल्या आहेत. तर गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी 6 वाजता प्रचारतोफा थंडावल्या.
Continues below advertisement