Locust Attack | टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री
Continues below advertisement
राज्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात 50 टक्के यश आले आहे. ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमन बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्याचा केले जाईल, असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. ते काल पुण्यात बोलत होते.
Continues below advertisement