Lockdown In Parbhani | परभणी जिल्ह्यात दोन दिवस लॉकडाऊन
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी
Updated at:
12 Mar 2021 05:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणी जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता पालक मंत्री नवाब मलिक यांनी जिल्ह्यात आज रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी म्हणजेच 15 मार्चपर्यंत दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठा लग्नकार्य या ठिकाणी कोरोनाचे नियम न पाळता लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे आज रात्री बारापासून शनिवार, रविवार दोन दिवस आणि सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परभणीकरांना कोरोनावर मात करण्यासाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर नाईलाजाने कडक लॉकडाऊन करण्याची वेळ येणार येईल, असेही नमूद केले आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.