Lockdown 4.0 | होम क्वारन्टाईनच्या वादातून मारहाण, लातूरच्या निलंग्यात दोघांचा मृत्यू

कोरोनामुळं घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक लोकांचे हाल होत आहेत. अशात मुंबई, पुणे अशा महानगरात गुजराण करणारी ही लोकं 'गड्या आपला गाव बरा' म्हणत गावाकडं पोहोचत आहेत. मुंबई पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं इथून आलेल्या लोकांना गावात व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याचे प्रकार समोर आले होते. तर काही ठिकाणी मुंबई-पुण्यावरुन आलेली लोकं गावात व्यवस्थित काळजी घेत नसल्याचंही समोर आलं होतं. अशात आता होम क्वारंटाईन होण्यावरुन वादातून लातूर जिल्ह्यात दोघांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola