Lockdown 4.0 | ठाकरे सरकार कोणती दुकानं सुरु करणार कोणती बंद ठेवणार?
महाराष्ट्रात रेड झोन वगळून इतर भागातली दुकानं सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकार घेणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.. चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारनं महत्त्वाच्या निर्णयाचं स्वातंत्र्य राज्य सरकारला दिलंय. कोणती दुकानं सुरु ठेवायची आणि कोणती बंद ठेवायची याचा निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रेड झोन वगळून दुकानं सुरु करण्यास राज्य सरकारन अनुकुल असल्याचं कळतंय. त्यामुळं महाराष्ट्र सरकार यासंदर्भात आज मोठी घोषणा करणार का? हे पहावं लागेल... त्याच प्रमाणे रेड, ऑरेंज, ग्रीन या झोननिहाय जिल्ह्यांची यादी देखील आज जाहीर होण्याची शक्यता आहे.