Satara Flood : चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी सातारकरांची एकजूट, पुराच्या पाण्यातून केलं रेस्क्यू ऑपरेशन
Continues below advertisement
साताऱ्यातील वांग नदीवरचा पूल नदीत वाहून गेला. त्यामुळे त्या परिसरातील 25 कुटुंबातील 90 लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. यामध्ये एका बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. बाळ सुखरूप बाहेर यावं यासाठी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी जीव धोक्यात घालून प्रयत्न करत होते.चिमुकल्या बाळाला मानवी साखळीतून व्यवस्थित रित्या अलगद बाहेर काढलं. बाळाला घेऊन अलगदपणे नदी पार केली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. स्थानिकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. हे बाळ आणि या बाळाची आई आता सुखरूप आहे.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Heavy Rainfall Satara Flood Monsoon Update Maharashtra Rains Update Monsoon 2021 Satara BabyRescue Operation