Maharashtra Unlock : उद्यापासून ग्रंथालये, मुंबई मेट्रो सेवा सुरु होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास काहीसा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.