Leopard Relocation: 'या बिबट्यांना Gujarat मध्ये कधी स्थलांतरित करणार?', जुन्नरमधील स्थानिकांचा सवाल
Continues below advertisement
पुण्यातील (Pune) जुन्नर (Junnar) आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी एकाच वेळी तीन-तीन बिबटे आढळून आल्याने त्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, 'हेच बिबटे गुजरातच्या (Gujarat) वनक्षेत्रासह विविध राज्यातील वनक्षेत्रात कधी स्थलांतरित केले जाणार?' असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. वनविभागाने साधारणपणे दहा चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या असल्याचे गृहीत धरले आहे, मात्र जुन्नरमधील प्रत्यक्षदर्शी घटनांमुळे या अंदाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे, महाराष्ट्र सरकारने ५० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील वन्यजीव केंद्रात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या निर्णयावर काही वन्यजीव तज्ञांनी चिंता व्यक्त केली असली तरी, वाढते हल्ले आणि नागरिकांचा दबाव यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement