Leopard Attack: बिबट्या प्रवण क्षेत्रात मुलांना एकटे सोडू नका, वनविभागाचे आवाहन

Continues below advertisement
उत्तर पुणे (Pune) जिल्हा, नाशिक (Nashik) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची वाढती संख्या आणि लहान मुलांवर होणारे हल्ले ही एक गंभीर समस्या बनली आहे. याच पार्श्वभूमीवर, वनविभागाने (Forest Department) एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. 'कमी उंचीच्या सजीवांवर बिबट भक्ष्य समजून हल्ला करू शकतो, त्यामुळे लहान मुलांना एकटे सोडू नका,' असे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबट्या प्रवण क्षेत्रांमध्ये नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी विभागाने एक जनजागृतीपर व्हिडिओ देखील जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून 'अमला एकटे नका सोडू, अमला बिबट्यापासून सावध राहू' अशा गीताने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाढत्या घटनांमुळे स्थानिक प्रशासनाने अनेक गावे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola